Lionel Messi : लियोनेल मेस्सी उद्या पीएसजीतर्फे शेवटचा सामना खेळणार

Lionel Messi : लियोनेल मेस्सी उद्या पीएसजीतर्फे शेवटचा सामना खेळणार
Published on
Updated on

पॅरिस; वृत्तसंस्था : लियोनेल मेस्सी यंदा पीएसजीतर्फे शनिवारी आपला शेवटचा सामना खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हंगामात सर्व प्रकारात पीएसजीतर्फे मेस्सीने 21 गोल केले व 20 असिस्ट नोंदवले आहेत. मेस्सी यापूर्वी 2021 मध्ये बार्सिलोनामधून दोन वर्षांच्या करारासह पीएसजी संघाशी करारबद्ध झाला होता. (Lionel Messi)

35 वर्षीय मेस्सीने कतारमध्ये अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. शिवाय, सातव्यांदा बॅलॉन ओडोर पुरस्कारावर देखील आपली मोहर उमटवली. मागील महिन्यात मेस्सीला परवानगी न घेता सौदी अरेबियाचा दौरा केल्याबद्दल दोन आठवड्यांसाठी निलंबित केले गेले होते. मात्र, नंतर त्याने दिलगिरी व्यक्त करत त्या वादावर पडदा टाकला होता. मेस्सी पीएसजीमध्येच राहणार का, याबद्दल साशंकता होती. मात्र, त्याला पुढील हंगामासाठी सौदी अरेबियाच्या अल-हिलाल संघाकडून ऑफर मिळाली असल्याचे त्याच्या एका निकटवर्तीयाने नमूद केले आहे. (Lionel Messi)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news