Lionel Messi suspended : धक्कादायक! मेस्सीचे PSG क्लबमधून निलंबन, न सांगता सौदीला गेल्याने कारवाई

Lionel Messi suspended : धक्कादायक! मेस्सीचे PSG क्लबमधून निलंबन, न सांगता सौदीला गेल्याने कारवाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएसजीचा फॉरवर्ड खेळाडू आणि महान फुटबॉल लिओनेल मेस्सीला दोन आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. मेस्सी (Lionel Messi)  परवानगी न घेता दोन दिवस सौदी अरेबियाला गेल्याने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मंगळवारी फ्रेंच दैनिक स्पोर्ट्स न्यूज पेपर L'Equipe ने याबाबत खुलासा केला आहे. या वृत्तानुसार मेस्सीने क्लब व्यवस्थापनाची कसलीही परवानगी न घेता सौदी अरेबियाचा दोन दिवसांचा दौरा केला. या कारणास्तव त्यालचे दोन आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

या दरम्यान मेस्सी संघासोबत खेळू शकणार नाही, तसेच त्याला सराव सत्रात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली असून त्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी मेस्सी PSG च्या (Lionel Messi) आगामी लीग 1 चे सामने विरुद्ध खेळू शकणार नाही. हे सामने ट्रॉयस आणि अजाकियो विरुध्द आहेत. पण तो 21 मे रोजी ऑक्झेरे विरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन करू शकतो.

PSG सध्या फ्रेंच फुटबॉल लीग लीग 1 च्या गुणतालिकेत तो (Lionel Messi) अव्वल स्थानावर आहे. संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी 33 सामन्यांत संघाचे 75 गुण झाले आहेत. तर मार्सेल संघाचे 33 सामन्यांमध्ये आतापर्यंत 70 गुण मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लेन्स टीम आहे. या संघाने 33 सामनेही खेळले असून या संघाच्या खात्यात एकूण 69 गुण आहेत. मोनॅकोने 33 सामन्यांत 68 गुण मिळवले आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news