Life Style WinterTips : हिवाळ्यातील गुडघे दुखी कमी करण्यासाठी ‘कच्च्या हळदीचे लाडू’ उपयुक्त, वाचा रेसिपी…

LLife Style - Winter Tips
LLife Style - Winter Tips

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style WinterTips : हिवाळा आला की साधारणपणे चाळीशीतील पुढील व्यक्तींना गुडघे दुखी, सांधे दुखीचा त्रास हमखास होतो. हिवाळ्यातील वातावरणाचा सरळ-सरळ परिणाम आरोग्यावर होतो. विशेष करून हाडांवर याचा परिणाम होतो. त्यामुळे हिवाळ्यात विशिष्ट पौष्टिक आहार करण्यावर आपल्याकडे भर देण्यात आला आहे. त्यामध्ये पांढरे तिळ, गुळ, हिरव्या भाज्या, पिवळी फळे हे खाण्यास अधिक भर दिला आहे. यातील अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे. मात्र, 'कच्च्या हळदीचे लाडू' हे देखिल खूप पौष्टिक असतात. हे माहित आहे का?

Life Style WinterTips : हळदीचे गुणधर्म

आहार शास्त्रात हळद ही सर्वोत्तम औषधी मानले गेले आहे. आयुर्वेदानुसार तर हळदीचे हजारो फायदे वेगवेगळ्या आजारांसाठी देण्यात आले आहे. त्यात आपल्याला मुख्यत्वे करून त्वचेसाठीचे उपाय माहित आहे. हळदीचा गुणधर्म हा मुळातच उष्ण असतो. त्यामुळे ही शरीरासाठी उष्ण असते. हळदीच्या याच गुणधर्मामुळे हळदीचा आहारातील उपयोग हिवाळ्यात अधिकाधिक उपयुक्त ठरतो.

Life Style WinterTips : तुमचा जर कधी हात-पाय मुरगळला, किंवा चुकून हाड मोडले. हात ओढला गेला. तर अशावेळी हळदीचा लेप करून तो गरम-गरम लेप लावला जात असे. कारण हळदीत असणा-या गुणधर्मांनी सूज लगेच उतरून जाते. तसेच त्यामुळे हाड-सांधा जोडण्यासाठी देखिल याचा उपयोग होतो. त्यामुळेच हिवाळ्यात हळदीचा आहारातील उपयोग वाढवणे हे गुडघे दुखी, सांधे दुखी कमी करते आणि आराम मिळतो. त्यामुळेच भारतातील मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश या थंडी जास्त असणा-या प्रदेशांमध्ये हिवाळ्यासाठी खास कच्च्या हळदीचे लाडू बनवले जातात. तुम्ही ही यावेळी याचा उपोयग करून पाहा..

Life Style WinterTips : वाचा रेसिपी

साहित्य – कच्ची हळदी, 150 ग्राम, बदाम- 1 कप, तुप एक कप, गव्हाचे पीठ सव्वा कप, डिंक पाव कप, किसलेले खोबरे एक कप, गुळ – दीड कप

कृती – सर्व प्रथम कच्ची हळद धुवून, घ्या. नंतर बटाटे सोलतात त्याप्रमाणे कच्ची हळद सोलून घ्या, सोललेली हळद खिसणीवर किसून घ्या. (गाजर किसतो त्याप्रमाणे).

Life Style WinterTips आता पॅन घेऊन त्यात तूप सोडा तूपात सर्व प्रथम डिंक तळून घ्या. नंतर हा डिंक वाटून घ्या. त्यानंतर बदाम हलकेच भाजून त्याची पेस्ट करून घ्या. आता कच्ची हळदी तुपात चांगली भाजून घ्या. हळद भाजल्यानंतर सर्वात शेवटी पीठ तुपात भाजून घ्या. तूप हलकेच भाजून झाले की त्यात कच्ची हळद, बदाम पूड, वाटलेला डिंक घालून हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यानंतर गूळ टाका. गूळ उष्णतेमुळे वितळेल. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. थोडे थंड (हाताला चटका बसणार नाही) असे असतानाच त्याचे लाडू वळून ठेवा.

सांधे दुखी, गुडघे दुखीसाठी दररोज एक याप्रमाणे हे लाडू खाणे. निश्चितच फायदेशीर ठरेल.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news