पुणे : दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी

पुणे : दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी

लोणी-धामणी ; पुढारी वृत्तसेवा बेल्हे-जेजुरी या राज्य मार्गावर लोणी (ता. आंबेगाव) येथे लोणी-पाबळ शिवेवर दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी झाला. एक दुचाकी चालक काल (गुरुवार) रात्री साडेआठ वाजता या रस्त्यावरून वेगाने जात होता. यावेळी अंदाजे सात ते आठ महिन्याचा बिबट्या त्‍याच्या दुचाकीला आडवा आला. यावेळी या भरधाव दुचाकीची बिबट्याला धडक बसली. यामध्ये बिबट्या जखमी झाला, अशी माहिती वनरक्षक साईमाला गित्ते यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती अशी की, बेल्हे-जेजुरी रस्त्यावर भरधाव दुचाकी चालकाने बिबट्याला धडक दिल्याने बिबट्या जखमी झाला. याची माहिती वनकर्मचारी बाळासाहेब आदक यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरीत आपल्या वरिष्ठांना कळविले. वरिष्ठ वनपाल सोनल भालेराव यांच्या सूचनेनुसार वनरक्षक साईमाला गित्ते यांनी पिंपरखेड (ता. शिरूर) येथील वनपाल जी. एम. पवार यांना कळविले.

वनरक्षक साईमाला गित्ते त्वरीत घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वरिष्ठांशी संपर्क केला. तोपर्यंत वनपाल पवार हे वनविभागाची गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याला मानिकडोह (ता. जुन्नर) येथील निवाराकेंद्रात उपचारासाठी हालविण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे परिसरात कौतूक होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news