समाजवादी पार्टीचे नेते आझम खान रुग्णालयात दाखल

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान रुग्णालयात दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आझम खान यांच्‍या छातीत वेदना हाेत हाेत्‍या. त्‍यांनी आपली तब्येत ठीक नसल्याचे समर्थकांना सांगितले. यानंतर यानंतर आझम खान आपल्या मुलासोबत उपचारासाठी दिल्लीत आले.

मागील दाेन वर्षांहून अधिक काळ आझम खान विविध खटल्यांमध्ये सीतापूर कारागृहात हाेते. २० मे रोजी त्‍यांची जामिनावर सुटका करण्यात आली. कारागृहातून  सुटल्यानंतर आझम खान रामपूरला पोहोचले. त्यानंतर त्यांनी मुलगा अब्दुल्ला आझम याच्यासह लखनौ विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतली. रामपूरला येथील निवास्थानी त्यांनी २ दिवस विश्रांती घेतली.

आझम खान यांची तब्बल २७ महिन्यांनंतर २० मे रोजी सीतापूर कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. सीतापूर कारागृहात आझम यांची दोनदा प्रकृती बिघडली होती. दोन्हीवेळा त्यांना लखनौ येथील मेदांता येथे दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news