Layoffs in 2023 | Olx कडून १,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, जाणून घ्या कारण

Layoffs in 2023 | Olx कडून १,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, जाणून घ्या कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅस्पर्सच्या मालकीच्या इंटरनेट ग्रुप प्रोससचे वर्गीकृत युनिट असलेले Olx जागतिक स्तरावर सुमारे १५ टक्के म्हणजेच १,५०० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार करत आहे. या नोकरकपातीत भारतातील किती लोकांना काढून टाकले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने या वृत्ताला पुष्टी दिली आहे. (Layoffs in 2023)

कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "बदलत्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर OLX खर्च कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे, आम्ही आमच्या व्यवसायातील मनुष्यबळ कमी करत आहोत. ज्यांनी कंपनीच्या उलाढालीत महत्वाचे योगदान दिले त्यांना कंपनीतून वेगळे करताना आम्हाला खेद वाटत आहे. पण आमच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी असे करणे आवश्यक होते. या सर्व प्रक्रियेत कर्मचार्‍यांना न्याय्यपणे, सन्मानाने आणि आदराची वागणूक मिळेल."

Prosus संपूर्ण भारतात OLX Autos आणि OLX च्या माध्यमातून कार्यरत आहे. २००६ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने २००९ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. ही कंपनी BYJU'S, Swiggy, Meesho, Pharmaasy, Mensa Brands, Urban Company आणि इतर सारख्या अनेक भारतीय युनिकॉर्न कंपन्यांना देखील पाठबळ देते.

तंत्रज्ञान उद्योगातील लोकांसाठी या वर्षाची सुरुवात एका अस्वस्थतेने झाली. कारण टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली आहे. अॅमेझॉन ही २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची घोषणा करणारी पहिली कंपनी होती. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट तसेच गुगलनेही नोकरकपात केली आणि आता हेल्थकेअर टेक्नॉलॉजी कंपनी फिलिप्सने ६ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फिलिप्सने ४ हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. (Layoffs in 2023)


हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news