मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.११) केली. २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. याचबरोबर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार आदी पुरस्कारांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. Suresh Wadkar
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे, यासाठी तत्पर असल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.
1) सुरेश वाडकर (2023)
1) श्रीमती सुहासिनीजी देशपांडे (2022)
2) श्री. अशोक समेळ (2023)
1) श्रीमती नयना आपटे (2022)
2) पं. श्री. मकरंद कुंडले (2023)
1) पं. श्री. उल्हास कशाळकर (2022)
2) पं. श्री. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये (2023)
नाटक :
1) श्रीमती वंदना गुप्ते (2022)
2) श्रीमती ज्येती सुभाष (2023)
1) श्री मोरेश्वर निस्ताने (2022)
2) श्री. ऋषिकेश बोडस (2023)
1) श्रीमती अपर्णा मयेकर (2022)
2) श्री. रघुनंदन पणशीकर (2023)
1) श्री.हिरालाल रामचंद्र सहारे (2022)
2) कीर्तनकार श्री. भाऊराव थुटे महाराज (2023)
1) श्री. जयंत अभंगा रणदिवे (2022)
2) श्री. राजू राऊत (2023)
1) श्रीमती लता सुरेंद्र (2022)
2) श्री. सदानंद राणे (2023)
1) श्री. चेतन दळवी (2022)
2) श्रीमती निशिगंधा वाड (2023)
1) श्रीमती प्राची गडकरी (2022)
2) श्री. अमृत महाराज जोशी (2023)
1) पं. श्री. अनंत केमकर (2022)
2) श्री. शशिकांत सुरेश भोसले (2023)
1) श्रीमती संगीता राजेंद्र टेकाडे (2022)
2) श्री. यशवंत रघुनाथ तेंडोलकर (2023)
1) श्री. बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) (2022)
2) श्रीमती उमा खुडे (2023)
1) श्री. भिकल्या धाकल्या धिंडा (2022)
2) श्री. सुरेश नाना रणसिंग (2023)
हेही वाचा