पुणे : कात्रज बोगद्यानजिक दरड कोसळली

पुणे महानगरपालिकेने घटनास्थळावरील सुरू असलेल्या कामाची छायाचित्रे ट्वटरवरून जारी केली.
पुणे महानगरपालिकेने घटनास्थळावरील सुरू असलेल्या कामाची छायाचित्रे ट्वटरवरून जारी केली.

पुणे : पुढारीवृत्तसेवा : कात्रज येथील जुन्या बोगद्याच्या अलिकडे साधारण १०० मीटर अंतरावर दरड कोसळली असून नागरिकांनी या भागात प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन पुणे महानगरपालिकेने ट्विट करून केले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने ही दरड कोसळली. त्यामुळे दगड आणि मुरूम घाट रस्त्यावर आली. या घटनेत कोणतेही जीवित व वित्तहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कात्रज वरून कोंढानपूरच्या दिशेने जाणारी पीएमटी बस समोर डोंगरावरून मोठे दगड व मुरूम रस्त्यावर आला. ही घटना पाहता पीएमपी चालकाने मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, भारती विद्यापीठ पोलीस व पीडब्लूडी विभाग, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घटनास्थळी गेले.

रात्रीचा अंधार व वाहतूक कोंडी झाल्याने मदत कार्यास अडथळा येत होता.मात्र एक तासाच्या प्रयत्नानंतर मोठे दगड व मुरूम बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत २४×७ आपत्ती मदत कार्य व्यवस्था केली आहे. रात्रीच्या वेळी देखील एक कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यंत्रनेसह तैनात करण्यात आले आहेत.०२०-२५५०८९०० हा संपर्क क्रमांक देण्यात आला असून, आपत्तीबाबत तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त विजयकुमार वाघमोडे यांनी केले आहे.

कात्रज घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी गेलो.जेसीबीच्या साहाय्याने मोठे दगड व मुरूम बाजूला केला.एका तासात वाहतूक सुरळीत केली.

                                     – विजयकुमार वाघमोडे, सहाय्यक आयुक्त

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news