पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्या सीझनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर छोट्या पडद्यावर १३ ऑक्टोबर २०२३ पासून 'शांतीत क्रांती सीझन २' ( Shantit Kranti – 2 ) सादर करण्यास सज्ज आहे. या सिझनमध्ये प्रेक्षकांचे आवडते श्रेयस, प्रसन्न व दिनार काही साहसी बाबींचा सामना करणार आहेत. ज्याने प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन होणार आहे.
संबधित बातम्या
'शांतीत क्रांती २' ( Shantit Kranti – 2 ) च्या शूटिंगदरम्यान प्रसन्नची भूमिका साकारणारे ललित प्रभाकर यांनी त्यांच्या जीवनात पहिल्यांदाच ड्रायव्हर बनत बस चालवण्याचा अनुभव घेतला. अभिनय व संवादामध्ये संतुलन राखत आणि सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री घेत त्यांनी सराईतपणे बस चालवली.
हे आव्हानात्मक टास्क करण्याबाबत ललित प्रभाकर म्हणाले की, 'या सीझनमध्ये मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच बस चालवण्याचा अनुभव घेतला. मला बस चालवण्याच्या जबाबदारीसह ड्रायव्हिंग करताना संवाद सादर करण्याचे व सीन्स परफॉर्म करण्याचे आव्हान होते. या गुंतागूंतीमध्ये अधिक भर म्हणजे, आम्हाला गजबजलेल्या रस्त्यावर शूटिंग करायची होती. जे खूप आव्हानात्मक होते. असे अडथळे असताना आमचे दिग्दर्शक व संपूर्ण टीमने हे आव्हान पूर्ण करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास दाखविला. तसेच सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री घेतली. मला सांगावेसे वाटते की, बस चालवताना भूमिकेमध्ये सामावून राहणे अत्यंत आव्हानात्मक होते. पण, तो अत्यंत अनोखा अनुभव होता, जो माझ्या स्मरणात सदैव राहिल.'
टीव्हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेली सिरीज 'शांतीत क्रांती २' चे दिग्दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्लिन यांनी केलं आहे. या सिरीजमध्ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी व प्रियदर्शिनी इंदळकर यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. 'शांतीत क्रांती सीझन २' ही बेवसीरीज १३ ऑक्टोबरपासून चाहत्याच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा :