पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लापता लेडीज' चित्रपटात 'फूल' हे पात्र साकारणारी नितांशी गोयल मेट गाला 2024 मध्ये स्पॉट झाली. (Met Gala 2024) बॉलिवूड स्टार आलिया भट्ट सब्यसाची मुखर्जीची साडी आणि शानदार मेकअपमध्ये मेट गाला 2024 मध्ये दिसली. तर दुसरीकडे साध्या अंदाजात 'लापता लेडीज'ची नितांशी गोयल मेट गालाच्या कार्पेटवर उतरली. आमिर खान प्रोडक्शन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर तिचा हा लूक शेअर करण्यात आलाय. नितांशी लाल रंगाची साडी नसून कार्पेटवर उतरली. (Met Gala 2024) नितांशी गोयलने 'लापता लेडीज' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. मेट गाला मध्ये ती सिंपल लाल साडीत दिसली. वरून मरून रंगाची शॉल ओढून आपल्या लापता लेडीजमधील भूमिकेत दिसली.
नितांशी गोयलने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत फॅन्सना याबाबत माहिती दिली की, ती मेट गाला 2024 चा भाग बनली. एका फॅनने कॉमेंट करत लिहिले की, 'आपल्या सदाबहार लग्नातील साडीत 'फूल' बहरत आहे'. दुसऱ्या युजरने लिहिलं 'या सीझनचे आवडते 'फूल'. आलियानंतर नितांशी गोयलची मेट गालामध्ये चर्चा होताना दिसतेय. अनेक हॉलिवूड स्टार अनेकविध फॅशन सादरीकरण करत असताना मात्र नितांशी देसी लूकमध्ये साडी नेसून, शाल ओढून कॅमेराबद्ध झाली. त्यामुळे तिचे फॅन्स 'सिंपल बट ब्युटीफुल' म्हणत कौतुक करताना दिसत आहेत.
नितांशीला हा चित्रपट कसा मिळाला, याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले की, "माझ्याकडे ऑडिशनसाठी ३ सीन आले होते. तेव्हा मला माहिती नव्हतं की, हा चित्रपट आमिर सरांचा आहे. आणि दिग्दर्शन किरण मॅम यांचं आहे. मी केवळ ३ पाने वाचली . मला काहीही करून हा प्रोजेक्ट हवा होता. तीन सीन्सवर मी काम केलं. मला स्क्रिप्ट मिळताच विचार केला की, मला खूप तयारी करावी लागणार आहे. तिने अनेक चित्रपट, मालिका पाहून भोजपुरी अभिनेत्रींचा अभिनय पाहिला. अखेर माझे स्वप्न साकार झाले."
हेही वाचा-