Kupwara Encounter: काश्‍मीरमध्‍ये घुसखोरीचा डाव उधळला; दाेन दहशतवाद्यांचा खात्मा

Kupwara Encounter
Kupwara Encounter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव आज (दि.३०) सुरक्षा दलांनी उधळला.  मछल सेक्टरमधून दहशतवादी घुसखाेरीचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. (Kupwara Encounter)

कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिक कुपवाडा जिल्हा अंतर्गत मच्छल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर कुमकारी हैहामा भागात गस्त घालत होते. दरम्यान, आज (दि.३०) पहाटे  दहशतवाद्यांनी 'पीओके'मधून भारतीय हद्दीत घुसखाेरीचा प्रयत्‍न केला. भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. (Kupwara Encounter)

कुपवाडा येथे मारल्या गेलेल्या घुसखोरांकडून दोन असॉल्ट रायफल, चार मॅगझिन, 90 काडतुसे, एक पिस्तूल आणि पाकिस्तानी चलनातील 2100 रुपये जप्त करण्यात आले आहेत. परिसरात शाेध माेहिम सुरु आहे. (Kupwara Encounter)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news