Pakistan Media Talk Show : पाकिस्तानातील दोन राजकीय नेत्यांमध्ये टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Pakistan Media Talk Show : पाकिस्तानातील दोन राजकीय नेत्यांमध्ये टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील एका न्यूज चॅनलच्या लाइव्ह टॉक शोदरम्यान दोन पाकिस्तानी नेत्यांमध्ये हाणामारी झाली. जावेद चौधरी यांच्याकडून होस्ट करण्यात आलेल्या ‘कल तक’ या लोकप्रिय टॉक शोमध्ये ही घटना घडली. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Pakistan Media Talk Show)

या राजकीय लाईव्ह टॉक शोमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या तेहरीक-ए-इन्साफचे वकील शेर अफजल खान मारवत आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) सिनेटर अफनान अल्लाह उपस्थित होते. चर्चेदरम्यान पाकिस्तान मुस्लिम लीगच्या सिनेटरने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर यांच्यावर गैरवर्तन आणि लष्करी आस्थापनेशी गुप्त चर्चा केल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांना युक्तीवादाने उत्तर न देता, वकील शेर अफजल यांनी लाईव्ह शोमध्येच सिनेटर अफनान अल्लाह यांच्यावर शारीरिक हिंसाचाराचा अवलंब केला. (Pakistan Media Talk Show)

लाईव्ह टॉक शो मधील या गोंधळानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपआपली बाजू मांडण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. दरम्यान माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वकील मारवत यांनी पीटीआय अध्यक्षांवरील अशा प्रकारची टिप्पणी अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हणाले. तर सिनेटर अफनान अल्लाह यांनी या हिंसेवर आपले मत व्यक्त करताना, मारवत यांनी काल टॉक शोमध्ये माझ्यावर हल्लाचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button