Kuldeep Yadav : कुलदीपची कमाल! ‘या’ प्रकारात थेट दुस-या स्थानी झेप

Kuldeep Yadav : कुलदीपची कमाल! ‘या’ प्रकारात थेट दुस-या स्थानी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने (Team India) आशिया कपच्या (Asia Cup) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) मोलाचा वाटा असून तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. एकप्रकारे एकदिवसीय विश्वचषकापूर्वी (ODI World Cup) या त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) चांगलाच संकेत मानला जात आहे. दरम्यान, त्याने आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विशेष यादीत तो टॉप 2 मध्ये पोहोचला आहे.

कुलदीपची कमाल

आशिया कपच्या केवळ दोन सामन्यांमध्ये कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) इतकी शानदार गोलंदाजी केली की तो आता विशेष यादीत पहिल्या 2 नंबरमध्ये पोहोचला आहे. कुलदीपने आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. 2023 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला. त्याने अवघ्या 15 सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. या यादीत नेपाळचा संदीप लामिछाने पहिल्या स्थानावर आहे. लामिछाने याने 21 सामन्यात 43 बळी घेतले आहेत. कुलदीपचा हा फॉर्ममध्ये कायम राहिला तर तो आशिया कपदरम्यानच लामिछानेलाही मागे टाकू शकतो.

कुलदीपचा विक्रम (Kuldeep Yadav Rcord)

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण केले. या गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध 4 विकेट घेण्यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 5 बळी घेतले होते. सर्वात वेगवान 150 बळी घेणारा कुलदीप हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने केवळ 88 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्या पुढे फक्त मोहम्मद शमी आहे ज्याने अवघ्या 80 सामन्यात 150 विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या सामन्यात कुलदीपच्या फिरकीमुळे टीम इंडियाने तो सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news