कोल्‍हापूरचं अल्‍पवयीन प्रेमी युगुल घरातून गेलं पळून, नागपुरात पोलिसांनी घेतलं ताब्‍यात

Love Story
Love Story

राशिवडे ; पुढारी वृतसेवा वय पुर्ण झाल्यानंतर लग्न करु या निश्चयाने घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन युगलप्रेमींना नागपूर वाटोडा येथुन राधानगरीच्या उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी ताब्यात घेतले. युवती राधानगरी तालुक्यातील तर युवक करवीर तालुक्यातील आहे. दोघांच्याही पालकांनी करवीर व राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली होती. या दोन्ही अल्पवयीन युगलप्रेमींना बालसुधारगृहामध्ये दाखल करण्यात आले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील एक अल्पवयीन युवक आणि राधानगरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयात सुत जुळले. हे दोघेही अल्पवयीन असल्याने दोघांनीही घरातून पलायन केले. लग्नासाठी आवश्यक वय पुर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचा निश्चय करुन हे दोघे नागपूर येथे एकत्र रहात होते. नागपूर येथील वाटोडा पोलीसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधुन याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर राधानगरीच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील व करवीर पोलीसांनी नागपूर गाठत या अल्पवयीन युगलप्रेमींना ताब्यात घेतले. मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या दोन अल्पवयीन युगलप्रेमींना बालगृहामध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news