Kolhapur : A. S. Traders Fraud Case : अंगठीतील 1 कोटीच्या हिर्‍याची ‘त्‍या’ व्यापार्‍याकडून 80 लाखांना परस्पर विक्री

Kolhapur : A. S. Traders Fraud Case : अंगठीतील 1 कोटीच्या हिर्‍याची ‘त्‍या’ व्यापार्‍याकडून 80 लाखांना परस्पर विक्री
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक A. S. Traders fraud case  करणार्‍या ए. एस. ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार याच्या एक कोटीच्या हिर्‍याच्या अंगठीची सांगलीतील एका बड्या व्यापार्‍याने परस्पर 80 लाखांना विक्री केल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत निष्पन्न झाली आहे. संबंधित व्यापार्‍याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न विविध कंपन्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक A. S. Traders fraud case  केलेल्या रकमेचा आकडा प्रथमदर्शनी 1500 ते 1600 कोटीचा असला तरी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय कंपनीकडे रोख स्वरूपात जमा झालेली रक्कम, बँक व्यवहारातील उलाढाल, मुदतीनंतरचा परतावा, एजंटांचे दिलेले कमिशन या तांत्रिक बाबी स्पष्ट होण्यासाठी 2017 ते 2022 या काळातील कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहाराच्या फॉरेन्सिक ऑडिटचा निर्णय घेण्यात येत आहे. संबंधित प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत राज्य शासनाकडे लवकरच पाठविण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले.

जादा परताव्याच्या आमिषाने कंपनीने गुंतवणूक करून घेताना बहुतांशी गुंतवणूकदारांकडून रोख स्वरूपात पैसे स्वीकारले आहेत. मात्र संबंधित कोट्यवधींची रक्कम रेकॉर्डवर दाखविली नाही. ट्रेडिंगसाठी घेतलेले पैसे अन्यत्र ठिकाणी गुंतविले आहेत. कंपनीत आर्थिक बाबीवरून A. S. Traders fraud case  वाद-विवाद तसेच संचालकांमध्ये दोन गट पडल्यानंतर एकमेकांवर कुरघोड्यांचा प्रयत्न सुरू झाला. त्यात अनेक गंभीर बाबी लपविण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

फॉरेन्सिक ऑडिटची दुसर्‍यांदा मागणी

कंपनीतील संशयास्पद आर्थिक उलाढालीसंदर्भात फॉरेन्सिक ऑडिटचा यापूर्वीही प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. गृह खात्याच्या शिफारशीनंतर राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली. A. S. Traders fraud case  मात्र नियुक्त करण्यात आलेल्या ऑडिटरने त्यास असमर्थतता दर्शविली. त्यामुळे दुसर्‍यांदा ही मागणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

म्होरक्या सुभेदारला अटक केल्यानंतर अनेक बाबी तपासातून स्पष्ट झाल्या आहेत. त्याचा तपशीलही लवकर समजू शकेल. सुभेदारने स्वत:साठी कोल्हापूर येथील एका ज्वेलरीतून 1 कोटीचा हिरा खरेदी केला होता. कंपनी अडचणीत आल्यानंतर संशयिताने एक कोटीचा हिरा असलेली अंगठी सांगलीतील त्याचा मित्र असलेल्या एका बड्या व्यापार्‍याकडे दिली होती. मात्र संबंधित व्यापार्‍याने अंगठीतील हिरा काढून त्याची परस्पर 80 लाखांना विक्री केल्याचा प्रकार चौकशीतून उघड झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाठराखण करून पैसे उकळणारे नगरसेवक कोण ?

सुभेदार व संचालकांच्या गैरकृत्यांना पाठीशी घालण्यासाठी शहरातील दोन माजी नगरसेवक, राजकीय पक्षांच्या काही पदाधिकार्‍यांनी त्यांना अभय दिले होते. त्या मोबदल्यात त्याच्याकडून मोठमोठ्या रक्कमा उकळण्यात आल्या आहेत. ते दोन नगरसेवक कोण याची शहरात चर्चा आहे. संबंधितांवर कारवाई होणार का याकडे गुंतवणूकदारांचे A. S. Traders fraud case  लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news