KK Love story : लहानपणीच्या मैत्रीणीसोबतच जुळले प्रेमाचे धागे; पण एका क्षणात सुटली साथ

KK Love story : लहानपणीच्या मैत्रीणीसोबतच जुळले प्रेमाचे धागे; पण एका क्षणात सुटली साथ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कृष्ण कुमार उर्फ केके कुन्नथ बॉलीवूड म्यूजिक इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव होते. आपल्‍या स्‍वरांनी त्‍यांनी चाहत्‍यांना मंत्रमुग्‍ध करत बॉलीवूड इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. के. के. यांची  लव्हस्टोरीदेखील रंजक आहे. त्‍यांनी शाळेतील मैत्रीणीशीच प्रेमविवाह केला, पण एक क्षणात ही साथ सुटली.

प्रसिद्ध गायक केके यांने आपलं वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवले हाेते. काही मोजकेच लोक आहेत, ज्यांना माहित होतं की, केकेने आपल्या शाळेतील मैत्रीणीशीच प्रेमविवाह केला हाेता. त्याच्या पत्नीचे नाव ज्योती आहे. केके आणि त्याची पत्नी ज्योती यांना  मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्‍य आहेत.

अशी सुरू झाली लव्हस्टोरी

केके याने एका टीव्ही शो दरम्यान सांगितले होते की, "ज्योतीशी त्याची ओळख ते दोघे  सहावीच्या वर्गात असताना झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते दोघे एकमेकांसोबत आहेत. 'मी माझ्या आयुष्यात फक्त एकाच मुलीला डेट केले आहे आणि ती म्हणजे माझी पत्नी ज्योती… मी खूप लाजाळू मुलगा होतो. कधीकधी माझी मुलंही मला याबद्दल चिडवत असतात".

लग्नासाठी करावी लागली नोकरी

केके आणि ज्योती लहानपणापासूनच सोबत होते. दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले. पण लग्नाआधीच केकेला स्वतःसाठीही नोकरी शोधावी लागली होती. त्यावेळी त्‍यांनी  सेल्समनची नोकरी स्विकारली होती. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. सहा महिन्यांतच त्‍यांनी पत्नी आणि वडिलांच्या पाठिंब्यामुळे ही नोकरी सोडली आणि पूर्णवेळ संगीत क्षेत्रात करीअर करण्‍याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news