Kirit Somaiya PHD : सोमय्या म्हणतात पीएचडी आहे..पण विद्यापीठाला माहितीच नाही!

Kirit Somaiya Tweet
Kirit Somaiya Tweet

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मिळविलेल्या पीएचडीची (Kirit Somaiya PHD) माहितीच उपलब्ध नसल्याचे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ता किरण फाटक यांना दिलेले उत्तराचे पत्र युवा सेनेने जाहीर केले आहे.

Kirit Somaiya PHD : माहिती दडपण्याचा प्रयत्न

मुंबई विद्यापीठातून कोणत्याही विद्यार्थ्याला पीएचडी प्राप्त झाल्यानंतर त्याची एक प्रत विद्यापीठातील प्रबंध विभाग, किंवा ज्या शाखेशी संबंधित पदवी आहे तो विभाग किंवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात असणे आवश्यक असते. किरीट सोमय्या यांना ज्या प्रबंधावर मुंबई विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली तो प्रबंध विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात असणे अपेक्षित होते. ३१ मे रोजी माहिती अधिकारांतर्गत सोमय्या यांच्या पीएचडी संदर्भातील प्रमाणपत्रे आणि अन्य कागदपत्रांची प्रत तसेच अन्य शैक्षणिक माहिती विस्ताराने देण्याची मागणी माहिती हक्काच्या अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र सोमय्या यांच्या पीएचडी प्रबंधाची प्रत नेमक्या कुठल्या विभागात आहे किंवा आहे की नाही याबाबतची माहिती देण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून ६ महिने टाळाटाळ केली जात आहे.

ज्या अधिकारी / कर्मचारी यांच्याद्वारे माहिती दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्ह्यासह कठोर कारवाई करावी. तसेच किरीट सोमय्या यांच्या पीएचडीबाबत सर्व माहिती जनतेसमोर आणून संशय दूर करावा, अशी मागणी युवासेनेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news