पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल याच्या लग्नानंतर आणखी एक कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चर्चाही सोशल मीडियावर जोरदार पसरली आहे. Sidharth-Kiara कपलकडून किंवा कुटुंबीयांकडून याविषयी अधिकृत कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र, कियारा आणि सिद्धार्थ दोघेजण ६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे ५ फेब्रुवारीपासून ते ८ फेब्रुवारीपर्यंत कपलच्या लग्नाची धामधूम असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth-Kiara ) पंजाबी रितीरिवाजानुसार राजस्थानमधील जैसलमेरच्या 'सूर्यगड पॅलेस' मध्ये ६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. हा लग्न सोहळा ५ फेब्रुवारीपासून ते ८ फेब्रुवारी उत्साहात पार पडणार आहे. तर सिद्धार्थ आणि कियारा यांचा हळदी आणि संगीत समारंभही लग्नाच्या दिवशीच होणार असल्याचे बोलले जात आहे. या विवाहाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर मिळालेली नाही. मात्र, 'सूर्यगड पॅलेस' मध्ये हळदी, संगीत आणि मेहंदी विधींसाठी सेट डिझाइन करण्याचे काम सुरू झाले आहे.
या विवाहासाठी खास करून मोजकेच १०० ते १२५ पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या यादीत बॉलिवूडपासून ते इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर आणि वरुण धवनपर्यंत अनेक सेलिब्रिटीज आहे. तसेच पॅलेसमधील लक्झरी व्हिला बुक करण्यात आले असून त्यात पाहुण्यासाठी सुमारे ८४ खोल्या बुक केल्या आहेत. पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी ७० हून अधिक आलिशान कार बुक करण्यात आली आहेत. या पॅलेसचे दररोजचे भाडे १ ते २ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. लग्नाची जबाबदारी मुंबईतील एका मोठ्या वेडिंग प्लॅनर कंपनीला देण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
याआधी कियारा डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिल्लीला जाताना दिसली होती. यावरून ती लग्नाच्या कपड्यांच्या फिटिंगसाठी जात असल्याचा चाहत्यांनी अंदाज लावला आहे. लग्नानंतर हे कपल मुंबईत ग्रॅड वेडिंग रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत.
हेही वाचा :