खोची बालिका खूनप्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती

खोची बालिका खूनप्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील खोची येथील सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणी राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. खोची येथील सहा वर्षीय बालिकेचे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचदिवशी तिचा मृतदेह आढळून आला होता. सदर बालिकेचे प्रथम अपहरण, बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगाराला काही तासातच जेरबंद केले होते. या प्रकरणात बंडा उर्फ प्रदीप पोवार आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मूळचे कोल्हापूरचे असणारे ॲड. यादव राज्य शासनाच्या वतीने महत्वाच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा सिटी लीमोझिंन घोटाळा, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे कोपर्डी खून-बलात्कार प्रकरण, जवखेडे अहमदनगर येथील तिहेरी दलित हत्याकांड, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जामखेड दुहेरी हत्याकांड, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरण, पोलीस अधिकाऱ्याने कर्तव्यावर असताना मॉडेलवर केलेले साकिनाका बलात्कार प्रकरण, घाटकोपर येथील हिरे व्यापारी उदानी हत्याकांड, संगमनेर येथील व्यापारी गौतम हिरेन अपहरण-खून प्रकरण, रझा अकादमीच्या मोर्चावेळी घडलेली मुंबईतील आझाद मैदान दंगल प्रकरण यासह इतर महत्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news