Khalistani Activist : अमृतपाल सिंहचा काका आणि ड्रायवरचे पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Khalistani Activist : अमृतपाल सिंहचा काका आणि ड्रायवरचे पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Published on
Updated on

पुढारी : Khalistani Activist :  'वारीस पंजाब दे'चा प्रमुख आणि फरार खलिस्तानवादी अमृतपाल सिंहचा ड्रायवर आणि काकाने पंजाब पोलिसांसमोर आत्मसमपर्ण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्राइवर हरप्रीत आणि काका हरजीत सिंहने मेहतपूरमध्ये पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले आहे. काका हरजीत हा अमृतपालचा सल्लागार आहे. हरजीत हा देखील फरार होता. तो शनिवारी मर्सिडीज कार चालवत होता. त्याच्या म्हणण्यानुसार पोलिस जेव्हा पाठलाग करत होते तेव्हा तो आणि अमृतपाल वेगवेगळे झाले.

Khalistani Activist : दरम्यान फरार अमृतपाल सिंहला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुरक्षा कर्मचा-यांनी राज्यातील अनेक भागात फ्लॅग मार्च केले आणि प्रशासनात मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा आज सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
शनिवारी अटक करण्यात आलेला अमृतपालचा कथित सल्लागार आणि फायनान्सर दलजीत सिंग कलसी आणि इतर Khalistani Activist तिघांना रविवारी पंजाबहून एका विशेष विमानाने आसामला नेण्यात आले, जिथे त्यांना दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे आणि अफवा पसरवणार्‍यांना चेतावणी दिली की ते वेगवेगळ्या देश, राज्ये आणि शहरांमधून येणाऱ्या खोट्या बातम्यांवर लक्ष ठेवत आहेत.

त्यांनी सांगितले की Khalistani Activist अमृतपालला लवकरच अटक केली जाईल आणि शनिवारी त्याच्या संस्थेच्या 'वारीस पंजाब दे' (WPD) वर कारवाई सुरू झाल्यानंतर सुरक्षेत कोणतीही कमतरता नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news