khalaga movie
khalaga movie

काय ते गाव, काय ती गावातली माणसं! खळगं चित्रपट ‘या’ दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बरेचदा चित्रपटांची कथा ही आकर्षून घेणारी असते. आशयघन कथानक, बोलीभाषा, कलाकारांचा दमदार अभिनय या सगळ्याच बाबी लक्षात घेता चित्रपट पाहावा की नाही हे आजकाल प्रेक्षकवर्ग ठरवतात. अशातच नुकत्याच समोर आलेल्या एका हृदयस्पर्शी ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या व सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या 'खळगं' या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहू शकता. खळगं' चित्रपटाच्या कोणत्या दिवशी भेटीला येणार आहे, पाहुया.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कथानक. नवोदित कलाकारांना घेऊन केलेली ही आखणी प्रेक्षकांना भावुक करणारी आहे. पोलीस होण्याची उमेद, त्यासाठीची एका आई-लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग हे सगळं हुबेहूब या ट्रेलरमधून पाहायला मिळतंय. नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. गावखेड्यातील व सत्यघटनेवर आधारित 'खळगं' नव्या कोऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.

अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. 'कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मिती 'कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट'सह निर्माते गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी केलीय. सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे.

गावखेड्यात चित्रित झालेल्या आणि वास्तविकतेचं दर्शन घडवणाऱ्या या आशयघन चित्रपटात नवोदित कलाकारांनी चांगलाच कल्ला केला. माधवी जुवेकर, कार्तिक दोलताडे, सुलतान शिकलगार, रोशनी कदम, प्रज्वल भोसले, प्रितम भंडारे, कल्याणी पवार, शिवाजी दोलताडे, माणिक काळे, वैष्णवी मुरकुटे, ज्वालामुखी काळे, भैरव जाधव, संकेत कवडे, शिल्पा कवडे, मयूर झिंजे, मोहन घोलप, मंगेश ससाणे, ऐश्वर्या लंगे, गणेश शिंदे, शरद पवार या कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे. २२ सप्टेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news