पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर विचित्र अपघात; एक जण जागीच ठार

पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर विचित्र अपघात; एक जण जागीच ठार

पुणे : पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर कार आणि ट्रॅकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शाळेच्या बसचा देखील समावेश आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला असून कार मधील तीन जण, तर स्कूल बस मधील पाच शाळकरी मुलं किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कात्रज कोंढावा रोडवरील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ सकाळच्या सुमारास पाईप घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोराची धडक दिली या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून कार मधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसमधील पाच मुलं किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्कूल बस वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टाळला.

या घाटनेमुळे सकाळ पासून मोठी वाहतूक कोंडी या रस्त्यावर झाली आहे. कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघातच सत्र सुरूच आहे, मात्र प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news