Satyaprem Ki Katha : Kartik Aaryan-Kiara चा चित्रपट फ्रीमध्ये ओटीटीवर!

Satyaprem Ki Katha
Satyaprem Ki Katha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन सत्यप्रेमच्या भूमिकेत असेल. (Satyaprem Ki Katha) त्याला कथा नावाचा्या तरुणीशी (कियारा आडवाणी) प्रेम होतं. कार्तिक आर्यन बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. जूनमध्ये प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' मध्ये तो कियारा आडवाणीसोबत दिसला होता. (Satyaprem Ki Katha)

चित्रपटगृहात सिनेमा रिलीज झाल्यानंतर आता चित्रपट ओटीटीवर देखील पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाईड १२५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्यानंतर आता प्राईम व्हिडिओवर मोफत स्ट्रीम होत आहे. याबाबतची माहिती कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिलीय.

कार्तिक आर्यनने म्हणाला, त्याने या चित्रपटात जी भूमिका साकारली आहे, ती त्याची फेव्हरेट भूमिका आहे.

मनाच्या जवळ भूमिका

'सत्यप्रेम की कथा' मध्ये कार्तिक सत्यप्रेमच्या भूमिकेत दिसला होता. त्याला कथा नावाच्या तरुणीशी (कियारा आडवाणी) प्रेम होतं. मैत्री, प्रेम आणि लग्नापर्यंतचा आनंददायी प्रवासाची कहाणी यामध्ये दर्शवण्यात आली होती. कार्तिक या भूमिकेविषयी म्हणाला, 'सत्यप्रेम, माझ्या आतापर्यंतच्या आवडत्या भूमिकांपैकी ही भूमिका खूप आवडती असून माझ्या मनाच्या खूप खूप जवळ आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news