पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालास आता चार दिवस झाले आहेत. तरीही मुख्यमंत्रीपदावरुन राजधानी दिल्लीत खलबते सुरुच आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. दरम्यान आज (दि. १७) दोन्ही नेते काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.
(Karnataka CM Decision Updates )
काँग्रेसला चार दिवस उलटूनही कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. सोनिया गांधी सध्या सिमला येथे आहेत. त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे बंगळूरुमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांची भेट घेतली होती. मात्र या चर्चेतून ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दोन्ही नेत्यांना दिल्लीतच राहण्यास सांगितले आहे. सिद्धरामय्या यांची संख्या जास्त होत आहे, पण डीके समर्थक मात्र ठाम आहेत.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. ज (दि. १७) दोन्ही नेते काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. निरीक्षकांनी घेतलेल्या गुप्त मतदानात बहुतांश आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केले. दोन्ही नेत्यांना एकमत करण्यात तितकी अडचण येत नाही कारण ती समर्थकांची समजूत घालण्यात आहे. दोघांचेही समर्थक मागे हटायला तयार नाहीत त्यामुळे गेली चार दिवस कर्नाटकमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम राहिला आहे.
हेही वाचा :