NIA Raid : ‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

NIA Raid : ‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : NIA Raid : NIA (राष्ट्रीय तपास संस्था) चे बुधवारी हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. NIA ने गेल्या वर्षी दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले जात आहेत. यामध्ये दहशतवादी अमली पदार्थ तस्करी आणि संबंधित गुंडांसोबतच्या संगनमत प्रकरणांचा समावेश आहे. एएनआयने याचे वृत्त दिले आहे.

गॅंगस्टर,खलिस्तानी समर्थक तसेच तस्करांचे संघटित जाळे उध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अँक्शन मोडमध्ये आली आहे.बुधवारी सहा राज्यातील १०० हून अधिक ठिकाणी संस्थेने छापे टाकले.या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्व हादरले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय गुंड, खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांमुळे हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्यप्रदेशात या धाडी टाकण्यात आल्या.केंद्रीय संस्था आणि राज्य पोलीस दलाकडून पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह देशाच्या विविध भागात लपून बसलेले संघटित गुन्हेगार आणि दहशतवाद्यांवर कारवाई केली जात आहे,अशी माहिती समोर आली आहे.

दहशतवाद,हिंसाचार आणि गुन्हेगारी प्रकरणातील आरोप या कारवाईतून हाती आले आहेत.दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या टोळ्या सायबरस्पेसचा वापर करीत दहशतवादी आणि हिंसाचाराच्या कृत्याचा प्रचार करीत दहशत माजवत आहेत. हत्या आणि खंडणीचे कट अनेक राज्यातील वेगवेगळ्या तुरूंगातून रचले जात आहेत.विशेष म्हणजे परदेशातील एक संघटित नेटवर्कद्वारे हे अंमलात आणले जात होते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी गेल्या सात महिन्यात गॅंगस्टर-दहशतवाद्यांशी संबंधित २०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान एके-४७,ग्रेनेड लॉन्चर आणि हॅन्डग्रेनेडसह इतर शस्त्रे आणि दारुगोळा देखील हस्तगत करण्यात आला.पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील पोलिसांनी गुंडाचे जाळे उध्वस्त करण्यासाठी एकत्रित या धाडी टाकल्या आहेत.

मुंबईमध्ये १९९० च्या दशकात ज्याप्रमाणे गुन्हेगारांचे 'इकोसिस्टीम' तयार झाली होती, त्याचप्रमाणे आता गुन्हेगार सक्रिय झाले आहेत असे एनआयएने मार्च महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रातून सांगितले होते.गत सात महिन्यात एनआयएने ७ राज्यांमध्ये २०० हून अधिक ठिकाणी धाडी टाकत लपून बसलेले ३० गुंडांना त्यांच्या साथीदारांसह अटक केली होती. १३ मालमत्ता जप्त करीत ९५ बॅंक खाती देखील गोठवण्यात आली आहे. गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांविरोधात २० लुकआउट नोटीस देखील काढण्यात आल्या आहेत.

NIA Raid : पंजाब पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयावर 'आरपीजी' हल्ल्यातील आरोपीला अटक

एजन्सीने मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयावर मे 2022 मध्ये झालेल्या 'आरपीजी' हल्ल्यातील मुख्य नेमबाज दीपक रंगा याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून 'RC-37/2022/NIA/DLI' 25 जानेवारी 2023 रोजी अटक केली. या गुन्ह्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. आरोपी दीपक कॅनडास्थित गुंड-दहशतवादी लखबीर सिंग संधू ऊर्फ लंडा आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर-दहशतवादी हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा यांचा जवळचा सहकारी आहे. NIA Raid

आरपीजी हल्ल्याव्यतिरिक्त दीपकचा अन्य अनेक हिंसक दहशतवादी आणि गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सामील आहे. यामध्ये हिंसक हत्यांचा समावेश असून तो सक्रियपणे रिंडा आणि लांडा यांच्याकडून दहशतवादी निधी आणि लॉजिस्टिक समर्थन मिळवत आहे.

याशिवाय परदेशातील हशतवादी संघटना आणि दहशतवादी घटक देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरक्या आणि सदस्य यांच्यासोबत मिळून लक्ष्यित हत्या आणि हिंसक घटना घडवून आणत असल्याचे समोर आल्यानंतर एनआयएने 20 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. याशिवाय कॅनडास्थित अर्श डल्ला याला गृह मंत्रालयाने या वर्षी 9 जानेवारी रोजी 'वैयक्तिक दहशतवादी' म्हणून घोषित केले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news