Kapileshwar Temple : भूवनेश्वरमधील कपिलेश्वर मंदिर ASI ‘संरक्षित स्मारक’ यादीत येणार

Kapileshwar Temple : भूवनेश्वरमधील कपिलेश्वर मंदिर ASI ‘संरक्षित स्मारक’ यादीत येणार
Published on
Updated on

पुढारी ऑनआईन डेस्क : ओडिशा राज्याची राजधानी भूवनेश्वरमधील प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये जोडले जाणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१६) सांगितले. कपिलेश्वर मंदिराला एएसआयच्या (AS)I च्या संरक्षित स्मारकाच्या यादीत आणण्याची राजपत्रात अधिसूचना ५ मे रोजी आली होती. या वास्तूची देखभाल आणि संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या पूजारी आणि स्थानिक रहिवाशांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. (Kapileshwar Temple)

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे कपिलेश्वर मंदिराचे नुकसान

भूवनेश्वरच्या खासदार अपराजिता सदांगी यांनी ट्विटमध्ये कपिलेश्वर मंदिराचा एएसआयच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश केल्याबद्दल मंत्री किशन रेड्डी यांचे आभार मानले आहेत. खंडगिरी आणि उदयगिरी लेणी 'जागतिक वारसा स्थळे' म्हणून घोषित करण्याची विनंतीही सदंगी यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांना केली. कपिलेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी शिवराम मल्ल्या म्हणाले, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे कपिलेश्वर मंदिराचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. एएसआयच्या पाहणीदरम्यान काही मंदिराच्या स्थापत्यकलेचा काही भाग पुन्हा ठळक करण्यात आला. त्यामुळे हे मंदिर आता लिंगराज मंदिराप्रमाणे भुवनेश्वरमध्ये अधिक पर्यटकांना आकर्षित करेल.

Kapileshwar Temple : 'कपिलेश्वर मंदिर' बद्दल हे माहित आहे का?

कपिलेश्वर शिव मंदिर, त्याला 'कपिलेश्वर मंदिर' म्हणून ओळखले जाते. हे ओडिशा राज्यातील सर्वात जुने अस्तित्वात असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाचे तसेच ओडिशातील लोकांच्या खोल धार्मिक आणि सांस्कृतिक मुळांचे स्मरण करून देणारे आहे. भूवनेश्वरच्या ११ व्या शतकातील लिंगराज मंदिरापासून सुमारे १ किमी अंतरावर कपिलप्रसाद परिसरात असलेल्या कपिलेश्वर नावाने या मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते.

५ व्या शतकातील कपिलेश्वर मंदिराचे १४ व्या शतकात गजपती कपिलेंद्र देव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे भारतीय मंदिर इमारतींच्या शतकानुशतके जुन्या प्रथेची उदाहरणे असलेल्या उत्कृष्ट कोरीव काम आणि भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. कपिलेश्वर मंदिर हे कलिंग शैलीच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, जे त्याच्या अभिजात आणि साधेपणासाठी ओळखले जाते. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे संपूर्ण भारत आणि जगभरातील अभ्यागत आणि भाविकांना आकर्षित करते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news