Karnataka Election : साऊथ मेगास्टार किच्चा सुदीप भाजपात प्रवेश करणार?

Kannada actor Kiccha Sudeep
Kannada actor Kiccha Sudeep

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी कन्नड चित्रपट स्टार दिग्गज अभिनेता किच्चा सुदीप आणि दर्शन थूगुदीप बुधवारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) मध्ये प्रवेश करणार अशल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघे दुपारी दिड वाजता आणि दुपारी अडीज वाजता कर्नाटकातील बंगळुरुमध्ये एका खासगी हॉटेलमध्ये उपस्थित असतील. (Karnataka Election ) मीडिया रिपोर्टनुसार, सुदीप भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सहभागी होऊ शकतात. त्यांनी म्हटलं की, या दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेदेखील उपस्थित असतील. (Karnataka Election )

अभिनेते किच्चा सुदीप दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही लोकप्रिय आहे. त्याने 'फूंक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तर सलमान खानचा चित्रपट दबंग-३ मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत होता.

१० मे रोजी कर्नाटकात होणार निवडणूक

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. मतमोजणी १३ मे रोजी होईल. त्यचदिवशी निकाल जाहीर होईल.

दरम्यान, अभिनेता किच्चा सुदीपच्या व्यवस्थापकाला त्याचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. यानंतर पीएस पुट्टेनाहल्ली, बंगळुरू येथे कलम 120B, 506 आणि 504 IPC अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरमाचा पोलिस तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news