Kangana Ranaut : कंगनाने दादासाहेब फाळके पुरस्कारानंतर साधला निशाणा

Kangana Ranaut
Kangana Ranaut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांना मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यानंतर काही तासांतच बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) पुरस्कार विजेत्यांवर निशाणा साधत म्हणाली, नेपो माफिया सर्वांचे हक्क हिरावून घेतात. तसेच तिने तिच्या मते या वर्षीचा पुरस्कार कोणाला मिळायला हवा होता, पुरस्काराचे खरे मानकरी कोण असायला हवे होते याची एक यादी दिली आहे.

कंगनाने (Kangana Ranaut) शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'नेपो माफियाने सर्वांचे हक्क हिरावून घेण्यापूर्वी पुरस्कारांचा सीझन सुरू झाला आहे. माझ्या मते, या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी (कांतारा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-मृणाल ठाकूर (सीता रामम), सर्वोत्कृष्ट चित्रपट-कांतारा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – एसएस राजामौली (RRR), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनुपम खेर (काश्मीर फाईल्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – तब्बू (भूल भुलैया) यांना मिळायला हवा होता. हे लोक सोहळ्यात सहभागी होऊ देत किंवा नाही याचा फारसा फरक पडत नाही. हेच पुरस्काचे खरे मानकरी आहेत. या चित्रपट पुरस्कारांत कोणतीही सत्यता नाही. इथे काम पूर्ण केल्यानंतर मी मला योग्य वाटत असलेल्या स्टार्सची योग्य यादी तयार केली जाते आणि त्यांनाच पुरस्कार दिला जातो. परंतु, मला विचाराल तर मी नवी लिस्ट तयार करून त्यांच्याशी संपर्क करेल…धन्यवाद.'

यापुढे कंगनाने लिहिले की, 'नेपो माफिया स्टार्सच्या जीवनातील पालकांची नावे आणि जास्तीत-जास्त संपर्काचा वापर करून पुरस्कार देतात. काम मिळवण्यासाठी तेथे खूपजण अनेक प्रकाराचा वापर करतात. या जगात सेल्फ मेड माणूस आला तर त्याचे करिअर उद्ध्वस्त होते. कोणीतरी कसा तरी जगतो आणि सतत छळाची तक्रार करत असतो. स्वस्त माफिया पीआरने त्यांना मत्सर किंवा वेडे ठरवून त्यांना काढून टाकून बदनाम करायचे. ही तुमची कृती आहे. पंरतु, मी आता त्या प्रवृत्तीचा नाश करण्याचा निश्चय केला आहे. आजूबाजूला खूप वाईट परिस्थिती असताना जीवनाच्या सौंदर्यात मी गढून जाऊ शकत नाही. श्रीमद भागवत गीता सांगते की, वाईटाचा नाश करणे हे धर्माचे प्रमुख ध्येय आहे.'

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. आलियाने 'गंगुबाई काठियावाडी' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तर रणबीरने 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' साठी पुरस्कार मिळालाय. आणि वरुण धवनला 'भेडिया' चित्रपटातील अभिनयासाठी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news