पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२३ (Dadasaheb Phalke Awards 2023) चे सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) आयोजन केले होते. त्यात 'द काश्मीर फाईल्स'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि अनुपम खेर यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर रणबीर कपूर याला 'ब्रह्मास्त्र'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. तर 'कांतारा'तील भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी Most Promising Actor ठरला आहे. RRR ला फिल्म ऑफ द इअर (Film of The Year) म्हणून गौरवण्यात आले.
वरुण धवन याला भेडिया या चित्रपटासाठी क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. टेलिव्हिजन विभागात रुपाली गांगुली स्टारर 'अनुपमा'ने टेलिव्हिजन सीरिज ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना त्यांच्या 'चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर बाल्की, चूप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर कपूर, ब्रह्मास्त्र : भाग १
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाडी
मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर: ऋषभ शेट्टी, कांतारा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मनीष पॉल, जुग जुग जियो
चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदान : रेखा
सर्वोत्कृष्ट वेब सीरिज : रुद्र : द एज ऑफ डार्कनेस
क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता : वरुण धवन, भेडिया
फिल्म ऑफ द इअर : RRR
टेलिव्हिजन सीरिज ऑफ द इअर : अनुपमा
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेता : अनुपम खेर, द काश्मीर फाइल्स
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : झैन इमाम, फना: इश्क में मरजावां
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तेजस्वी प्रकाश, नागीन
सर्वोत्कृष्ट गायक : सचेत टंडन, मैय्या मैनू
सर्वोत्कृष्ट गायिका : नीती मोहन, मेरी जान
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद, विक्रम वेधा
संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान : हरिहरन
हे ही वाचा :