चेंबूर फेस्टिव्हलच्या लाईव्ह कार्यक्रमात सोनू निगमच्या असिस्टंटला धक्काबुक्की! | पुढारी

चेंबूर फेस्टिव्हलच्या लाईव्ह कार्यक्रमात सोनू निगमच्या असिस्टंटला धक्काबुक्की!

मुंबई : चेंबूर सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित चेंबूर फेस्टिव्हलचा समारोप प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या लाईव्ह कॉन्सर्टने चेंबूर जिमखान्यात झाला. सोनू निगमला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी केली आणि या गर्दीतून एक चाहता सोनू निगम यांना भेटण्यासाठी थेट मंचावर घुसला. सोनू निगमच्या सहाय्यकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्कीत सोनू निगमच्या असिस्टंटला किरकोळ दुखापत झाली.

सोनू निगम स्वतः आपल्या असिस्टंटला झेन या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तिथे प्रथमोपचार केल्यानंतर सोनू निगम व त्यांचा असिस्टंट घरी निघून गेल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

Back to top button