Tejas Teaser : ‘तेजस’चे टीजर आऊट, पायलटच्या भूमिकेत कंगना (Video)

kangana ranaut
kangana ranaut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रानौतचा बहुप्रतीक्षित चित्रपट तेजसचा टीजर रिलीज झाला आहे. कंगना वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत आहे. टीझरची सुरुवात कंगनाच्या सीक्वेन्सने सुरू झाली होती. (Tejas Teaser) एअरफोर्सच्या वर्दीत तिचा लूक एकदम दमदार दिसत आहे. कंगना एअरफोर्सच्या पायलट तेजस गिलच्या व्यक्तिरेखेत आहे. (Tejas Teaser)

संबंधित बातम्या – 

टीझर व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये एक संवाद ऐकू येतो- गरजेचे नाही की, प्रत्येकवेळी बातचीत व्हावी. युद्धाच्या मैदानात आता युद्ध होईल. आता माझ्या देशावर खूप मोठे संकट…आता तर आकाशातून पाऊस नाही तर आग आली पाहिजे. भारताला छेडाल तर सोडणार नाही.

यादिवशी रिलीज होणार चित्रपट

टीझरचा बॅकग्राउंड स्कोर खूप प्रभावी आहे. पायलटच्या लूकमध्ये कंगनादेखील दमदार दिसतेय. आज गांधी जयंतीच्या दिनी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. ८ ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाईल. रॉनी स्क्रूवालाच्या प्रोडक्शन हाऊस RSVP मूव्हीजच्या बॅनर अंतर्गत हा चित्रपट २८ ऑक्टोबर रोजी रिलीज होईल. सर्वेश मेवाडाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

kangana ranaut
kangana ranaut

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news