Kangana Ranaut :’हा आहे अस्लम’ म्हणत कंगनाने केला महेश भट्टांविषयी एक व्हिडिओ शेअर

mahesh bhatt and kangana ranaut
mahesh bhatt and kangana ranaut

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बोल्ड स्टाईल आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आता अभिनेत्री कंगना पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलीय. महेश भट्ट यांचा एक व्हिडिओ शेअर करताना कंगना राणौतने महेश यांच्या खऱ्या नावाचा खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, त्यांचे नाव महेश नसून 'अस्लम' आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. (Kangana Ranaut)

कंगनाने स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'महेश भट्ट यांनी त्यांचे खरे नाव वापरावे आणि कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करू नये. महेश यांनी त्यांचे खरे नाव सांगून आपल्या भावना व्यक्त केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

… म्हणून नाव बदलले

याच व्हिडिओतील आणखी एक क्लिप शेअर करताना कंगनाने लिहिले की, "मला सांगण्यात आले आहे की, त्याचे (महेश भट्ट) खरे नाव अस्लम आहे. त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीशी (सोनी राझदान) लग्न करण्यासाठी धर्मांतर केले. कंगनाने दुसरी क्लिप शेअर केली. यामध्ये तिने महेश यांचे खरे नाव सांगितले.

कंगनाने २००६ मध्ये आलेल्या 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट यांनी केली होती. पण, यानंतर तिने महेश भट्ट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. २०२० मध्ये कंगनाने महेश यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. जेव्हा कंगनाने महेश भट्ट्‌ यांची मुलगी, अभिनेत्री पूजा भट्टचा चित्रपट नाकारला होता. यावर्षीच्या सुरुवातीला कंगनाने आलियाचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी रिलीज होण्याआधी महेश भट्ट आणि त्यांची मुलगी आलिया भट्ट यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news