मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट | पुढारी

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.अमित शहा हे आज लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते भाजपच्या नगरसेवकांशीही चर्चा करणार आहेत. दरम्‍यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहा यांची भेट घेतली. सध्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या महत्‍वाच्या नेत्‍यांसोबत त्‍यांची बैठक सुरू आहे.

दरम्‍यान, आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाला अमित शहा काय कानमंत्र देणार हे महत्‍वाचे ठरणार आहे. एकुणच शिंदे गट आणि भाजपने महाराष्‍ट्रात सत्‍ता स्‍थापन केल्‍यावर अमित शहा यांचा हा पहिलाच दौरा आहे.

हेही वाचा :  

Back to top button