Lok Sabha Election:अखेर बृजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट, मुलगा करणभूषणला भाजपचे तिकीट

करण भूषण सिंह आणि बृजभूषण शरण सिंह (संग्रहित छायाचित्र )
करण भूषण सिंह आणि बृजभूषण शरण सिंह (संग्रहित छायाचित्र )
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले उत्तरप्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष राहिलेले बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया साक्षी मलिक, विनेश फोगाट, संगीता फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. या सर्व कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीत धरणे आंदोलनही केले होते. त्यांनतर बृजभूषण शरण सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.

पश्चिम उत्तरप्रदेशात राजपूत ठाकूर समाजाचे वर्चस्व आहे. या समाजातील ५ नेते राज्याचे मुख्यमंत्री होते. दोन नेत्यांनी पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली होती. बृजभूषण हे सुद्धा ठाकूर समाजाचे नेते आहेत. कैसरगंजसह आसपासच्या ६ लोकसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे.

भाजपने उत्तरप्रदेशातील २७ लोकसभा मतदारसंघात ठाकूर समाजाच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. गाझियाबाद येथून व्ही. के. सिंह यांचेही तिकीट कापण्यात आले. त्यामुळे भाजपविरोधात ठाकूर समाजात प्रचंड नाराजी आहे. या समाजाच्या नेत्यांनी महापंचायत घेऊन भाजपला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापताना भाजपपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.

ठाकूर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून त्यांच्या जागेवर कैसरगंज येथून त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी देण्याचा तोडगा काढला आहे. शुटिंगचे राष्ट्रीय खेळाडू असलेले करण भूषण सध्या उत्तरप्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. वडिलांवरआरोप झाल्यानंतरही ते या पदावर निवडून आले होते. करणभूषण पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news