पुढारी ऑनलाईन डेस्क: बीआरएस नेत्या के.कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा सबंधीत मनी लॉड्रिंग प्रकरणात आज (दि.२६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयातील सुनावणीनंतर के.कविता यांना मंगळवार ९ एप्रिलपर्यंत न्ययालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दिल्ली अव्हेन्यू न्यायालयाने के. कविता यांना आज २६ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ED ची कोठडी आज संपल्यानंतर कविता यांना आज न्यायालयीन १४ दिवस न्यायालय कोठडी सुनावण्यात आली आहे. (K Kavitha judicial custody)
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या या सुनावणीपूर्वी बीआरएस नेत्या के. कविता यांनी दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयात सुनावणीसाठी सोमवारी १ एप्रिलची तारीख निश्चित केली आहे, असे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. (K Kavitha judicial custody
के कविता यांना तिच्या ईडी कोठडीच्या शेवटी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आणले, यावेळी 'हि मनी लॉन्ड्रिंग केस नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग केस आहे'. दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरण एक बनावट आणि खोटा खटला आहे, असा आरोप करत तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. तसेच आम्ही स्वच्छ प्रतिमेने बाहेर येऊ, असा विश्वास देखील के. कविता यांनी व्यक्त केला आहे. (K Kavitha judicial custody)
हेही वाचा: