पुणे : अल्पवयीन मुलीवर स्कूलबस चालकाकडून लैंगिक अत्याचार; चालकाला अटक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका स्कूल बस चालकाला अटक केली आहे. सोमेश्वर घुले पाटील (वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला होता. याबाबत एका १५ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शाळेतून घरी येण्यास उशीर का झाला असे वडिलांनी विचारल्यानंतर आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे फिर्यादी मुलीने सांगितले. वडिलांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कुल बसमधून शाळेत ये जा करीत असे. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादी हिला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहिती नसताना तिने होकार दिला. तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.

१६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तिच्या वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी मुलीला खोदून खोदून चौकशी केली. तिने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. या प्रकाराने तिचे वडिल हादरुन गेले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. सामुहिक अत्याचाराच्या घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने या मुलीकडे चौकशी सुरु केली. तेव्हा पोलिसांशी बोलताना ही मुलगी गडबडून गेली. तिने खरा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सोमेश्वर घुले याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news