justin bieber : जस्टिन बीबरच्या तब्येतीत सुधारणा, भारतात ऑक्टोबरमध्ये परफॉर्म करणार

justin bieber
justin bieber

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉप गायक जस्टिन बीबरच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. जस्टिनला रामसे हंट सिंड्रोम नावाच्या आजाराने बराच काळ ग्रासले होते. त्यामुळे त्याला चेहऱ्याचा अर्धांगवायूचा झटका आला. हा पॉप गायक बराच काळ या आजाराशी लढत होता. मात्र यादरम्यान जस्टिनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पॉप सिंगरने पुन्हा एकदा त्याच्या वर्ल्ड टूरची घोषणा केली आहे.

या आजाराने त्रस्त होण्यापूर्वीच प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरने त्याच्या 'जस्टिस' अल्बमच्या प्रमोशनसाठी वर्ल्ड टूरची घोषणा केली होती. मात्र आजारपणामुळे तो रद्द करावा लागला. दरम्यान, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताच जस्टिन पुन्हा एकदा जगामध्ये आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे.

पॉप सिंगरच्या वर्ल्ड टूरच्या यादीत भारताचे नावही समाविष्ट आहे. आता या घोषणेनंतर जस्टिन बीबर भारतातही परफॉर्म करणार आहे. जस्टिन बीबर १८ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम (JLN स्टेडियम) येथे परफॉर्म करणार आहे. पॉप सिंगरच्या चाहत्यांसाठी हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे.

जस्टिन ३१ जुलै रोजी इटलीतील लुका समर फेस्टिव्हलमध्ये 'जस्टिस वर्ल्ड टूर' पुन्हा सुरू करेल. पॉप गायकांच्या युरोपियन फेस्टिव्हल रनला सुरुवात करेल. भारत, आशिया, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील कामगिरी सुरू राहील. त्यानंतर २०२३ मध्ये युरोपला परत जाईल. म्हणजेच, एकंदरीत पाहिल्यास, जस्टिस वर्ल्ड टूर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. ज्यामध्ये पॉप गायक ३० हून अधिक देशांमध्ये परफॉर्म करणार आहे.

या पॉप गायकाच्या कार्यक्रमासाठी आतापर्यंत १.३ दशलक्षाहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. जस्टिनच्या दिल्ली कॉन्सर्टच्या तिकिटाच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर तिकिटाती किंमत ४ हजार रुपयांपासून सुरू होते.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news