पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरलेला ध्रुव जुरेल याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेट जगतातील दिग्गज ध्रुव याची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत करत आहेत. आपल्या खेळीने क्रिकेट रसिकांच्या मनावर छाप पाडत असताना ध्रुवने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड यांच्यासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. (Junior to senior)
ध्रुव जुरेल याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी भावनिक पोस्ट करून त्यामध्ये त्यांना महान व्यक्ती म्हणून संबोधले आहे. ध्रुवने आपल्या कसोटी कारकिर्दीची विजयी सुरुवात करत भारताला राजकोट आणि रांची कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली हाेती. (Junior to senior)
इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या आधी ध्रुवने 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर राहूल द्रविड यांना महान संबोधत त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. द्रविड हे ध्रुवचे अंडर-19 विश्वचषक विजेत्या स्पर्धेत संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. आता ते वरिष्ठ राष्ट्रीय संघातही त्याचे प्रशिक्षक आहेत. 'X' वर केलेल्या पोस्टवर ध्रुवने ज्युनियर ते सिनिअर, पण नेहमीच या महान व्यक्तीचा विद्यार्थी, असे पोस्ट केले आहे.
अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत ध्रुव जुरेल भारतीय संघात होता. यावेळी राहुल द्रविड संघाचे प्रशिक्षक होते. भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने त्याला त्याची पदार्पणाची कसोटी कॅप दिली हाेती
हेही वाचा :