जुनेदनेच दाखवला इमामुलला ‘लष्कर ए तोयबा’चा मार्ग; इमामुलला उत्तरप्रदेशातून ठोकल्या बेड्या

इसिस
इसिस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कर ए तोयबा (एलईटी) या दहशतवादीसंघटनेच्या थेट संपर्कात असलेल्या फरार आरोपीशी मोहम्मद जुनेद मोहम्मद याने ओळख करून दिली होती. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या आफताबच्या चौकशीत हा प्रकार समोर आल्यानंतर इमामुल हक उर्फ अमामुल इम्तियाज (19, रा. पटना, जनपद गिरडीह, झारखंड सध्या रा. देवयंन्द, सहारनपूर, उत्तरप्रदेश) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तरप्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे जुनेदनेच इमामुलला लष्कर ए तोयबाचा मार्ग दाखविल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणात आतापर्यंत मोहम्मद जुनेद मोहम्मद, आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (रा. किश्तवाड, जम्मु काश्मिर) यांना अटक झाली आहे. तर या दोघांच्या तपासात इमामुल याला अटक करण्यात आली आहे. तपास समोर आलेली महत्वाची बाब म्हणजे, जुनेदने त्याला आपली ओळख दुरानी अशी करून दिली होती. त्याच नावाने तो त्याच्या संपर्कात होता. अटक संशयीत आरोपी जुनेद याने 'लष्कर ए तोयबा' या भारत सरकारने बंदी घातलेल्या संघटनेत भरती करण्या करता उमर नावाच्या फरार आरोपीशी ओळख करून दिली होती. तसेच इमामुलचे एटीएसने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव आहे. इमामुल याच्या विरूध्द उत्तरप्रदेशात यावर्षी देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार उत्तरप्रदेशातील सहानपुर मधील देवबंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील तपासात मिळालेल्या माहितीनुसार जुनेद हा इमामुल याच्याशी दुरानी नावाने संपर्कात होता. त्या एफआयआरमध्ये जुनेद देखील आरोपी असल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही गुन्ह्यात उमर फरार आरोपी असून, त्याचा थेट संबंध 'एलईटी'शी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानेच संघटनेत भरती करता जुनेद याला पैसे पाठविले होते. त्यानंतरच जुनेदने इमामुलला भरतीसाठी तयार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला उत्तरप्रदेशातून प्रवासी कोठडीद्वारे शिवाजीनगर येथीत विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

याचा करायचा आहे एटीएसला तपास

अटक करण्यात आलेला अमामुल हक व आरोपी जुनेद यांनी घातपाती कारवाया कट रचला होता का? कट रचला असल्यास, तो कट काय होता? याचा तपास एटीएसला करायचा आहे. इमामुल वापरत असलेल्या सामाजिक माध्यमाचे विश्लेषण करायचे असल्याने व माहिती मिळून आल्यानंतर त्यांच्याकडे चोकशी करायची आहे. इमामुल याने आणखीन कोणाला अशा प्रकारे प्रशिक्षण घेण्याकरीता त्यांचे मतपरीवर्तन केले होते याचा तपास करायचा आहे.

जुनेद, आफताब आणि इमामुल भारतात गर्दीच्या ठिकाणी घातपात व दहशतवादी कृत्य करणार असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याबाबत इमामुलकडे तपास करायचा आहे. त्यांनी कोठे कोठे रेकी केली? घातपाताच्या कारवाया करण्यासाठी शस्त्रास्त्र साठा अगर दारूगोळा पाठविला आहे का? संदेश वहनासाठी आरापींनी कोणत्या माध्यमांचा वापर केला, याचा तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी इमामुलच्या पोलिस कोठडीची मागणी केली. विशेष न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने ती मंजुर केली. गुन्ह्याचा तपास एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त अरूण वायकर करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news