Jofra Archer : आर्चरचा अ‍ॅशेसमधील सहभाग अनिश्चित?

Jofra Archer : आर्चरचा अ‍ॅशेसमधील सहभाग अनिश्चित?
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरला उजव्या ढोपरावर किरकोळ शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली होती. मात्र, यातून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार असून यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत त्याचा सहभाग धोक्यात असल्याचे वृत्त आहे. (Jofra Archer)

आर्चर सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील चार सामन्यांतही खेळू शकलेला नाही. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यापूर्वी दि. 8 एप्रिल रोजी जोफ—ाला किरकोळ दुखापत असल्याचे म्हटले होते. आर्चर उपचारासाठी बेल्जियमला देखील गेला होता. या हंगामात आर्चरने मुंबईतर्फे दोन सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून यात त्याने दोन बळी घेतले आहेत. या आठवडाअखेरीस राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढतीत तो उपलब्ध होईल, अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे. (Jofra Archer)

इंग्लंडतर्फे 2019 अ‍ॅशेस स्पर्धेत 22 बळी घेणार्‍या आर्चरने फेब—ुवारी 2021 नंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. यादरम्यान त्याला ढोपराच्या व पाठीच्या दुखापतीने सातत्याने त्रस्त केले आहे. ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक पॉल फॅरबेस यांनी आर्चर अ‍ॅशेसपर्यंत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे मागील महिन्यात म्हटले होते. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबस्टन येथे दि. 16 जूनपासून खेळवला जाणार आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news