Joe Biden Diwali Celebration: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्नी ‘जिल’सोबत असा साजरा केला ‘दिवाळी पाडवा’

Joe Biden Diwali Celebration
Joe Biden Diwali Celebration

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यूएस फर्स्ट लेडी, पत्नी 'जिल'सोबत दिवाळीचा सण साजरा केला आहे. बायटडेन यांनी पत्नीसोबत दिवा पेटवतानाचा व्हाईट हाऊसमधील एक व्हिडिए शेअर केला आहे. या व्हिडिओ पोस्टसोबत त्यांनी 'X' सोशल मीडिया अकाऊंटवरून (पूर्वी ट्विटर) एक संदेश देखील शेअर केला आहे. (Joe Biden Diwali Celebration)

भारतामध्ये दिवाळी सणाची धामधुम सुरू आहे. दरम्यान अनेक भारतीय लोक हे परदेशात आहेत. अमेरिकेत देखील अनेक भारतीय नागरिक राहतात, ते अनेक भारतीय सण परदेशातच साजरे करतात. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्नी जिल बायडेन सोबत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीनिमित्त दिवा उजळवला आहे. तसेच त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत एक संदेश देखील दिला आहे. (Joe Biden Diwali Celebration)

दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करत, बायडेन यांनी एक संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज (दि.१४) मी आणि जिलने द्वेष आणि विभाजनाच्या अंधारावर बुद्धि, प्रेम आणि एकतेचा प्रकाश म्हणून दिवा उजळवला, असे म्हटले आहे. तसेच आपण या सुट्टीच्या आणि आपल्या राष्ट्राच्या चिरस्थायी भावनेचा स्वीकार करूया. तसेच आपल्या सामायिक प्रकाशाचे सामर्थ्य प्रतिबिंबित करूया, असेही म्हटले आहे. (Joe Biden Diwali Celebration)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news