Jitendra Awhad Tweet : पुरुषदिनी आव्हाडांनी केलेले ट्विट चर्चेत…”गर्दीतून महिलांना …”

Kalaram Mandir :
Kalaram Mandir :

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट (Jitendra Awhad Tweet) करत आपल्‍या मनातील खंत व्यक्त केली आहे. (International Men's Day)

आव्हाड यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, "काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो, स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो, हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो, हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो, आणि गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष…"  आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिन असा हॅशटॅग दिला आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमीत्त ट्विट करत हा फोटो शेअर केला आहे
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमीत्त ट्विट करत हा फोटो शेअर केला आहे

Jitendra Awhad Tweet : काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील मारहाणप्रकरणी अटक दिनांक ११ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यावेळी त्यांनी  माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आव्‍हाड यांनी केला होता. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची १२ नोव्हेंबरला जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिन्याभरातील जितेंद्र आव्हाडांच्यावरील हा दुसरा गुन्हा होता.

ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम 13 नोव्हेबंर 2022 रोजी झाला होता. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. या कार्यक्रमात आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. ही भाजपची पदाधिकारी आहे. तक्रारदार महिला सदर कार्यक्रमावेळी या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी मला चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला.  त्यानंतर त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 मी आमदारकीचा राजीनामा देतोय

14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले होते की, "पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हा दाखल केले आणि तोही ३५४ चा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिस आत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही".

International Mens Day
International Mens Day

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news