Jitendra Awad: जितेंद्र आव्हाड यांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर टिकास्त्र

Jitendra Awad: जितेंद्र आव्हाड यांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर टिकास्त्र
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादाची भाषा करणारा हिटलर शेवटी हुकूमशाहीकडे गेला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. पंतप्रधानांनी मंगळवारी (दि.२८ जून) राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले की, राजकीय परिपक्वता आल्यानंतरच सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. परिवारवाद काय आहे, हे आजूबाजूला बघा म्हणजे लक्षात येईल, असा घणाघात त्यांनी मोदींवर केला.

दरम्यान, धार्मिक कायदे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. लग्नविधी हे त्या-त्या धर्मानूसार होतात. प्रत्येक धर्माचे धार्मिक कायदे आहेत. जगात सगळीकडेच असे कायदे आहेत. हा अभ्यासाचा विषय आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी समान नागरी कायद्यासंबंधी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news