jhulan goswami : झुलनने रचला इतिहास!, ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू

jhulan goswami : झुलनने रचला इतिहास!, ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू
jhulan goswami : झुलनने रचला इतिहास!, ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तिने बुधवारी (१६ मार्च) एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत जगातील कोणतीही महिला क्रिकेटपटू करू शकली नाही.

वास्तविक, झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज यापूर्वीच ठरली आहे. पण विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तिने आणखी एक नवा इतिहास रचला आहे. तिने सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्टला एलबीडब्ल्यू बाद करून आपल्या वनडे कारकिर्दीतील २५० एकदिवसीय विकेट्स पूर्ण केल्या. हा आकडा स्पर्श करणारी झुलन ही क्रिकेट इतिहासातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

झुलन गोस्वामी – १९९ वनडे, २५० विकेट्स

आतापर्यंत झुलनशिवाय (Jhulan Goswami) कोणत्याही महिला गोलंदाजाला २०० वनडे बळी घेता आले नाहीत. झुलनच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू कॅथरीन फिट्झपॅट्रिक आणि वेस्ट इंडिजची अनिसा इक्बाल यांचा क्रमांक आहे. कॅथरीनने १०९ वनडेत १८० आणि अनिसाने १३९ वनडेत १८० विकेट्स घेतल्या आहेत. अनिसा अजूनही खेळत असल्याने तिच्याकडे कॅथरीनला मागे टाकण्याची संधी आहे. २०० बळी घेणारी ती दुसरी गोलंदाज बनू शकते.

झुलन (Jhulan Goswami) विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज..

३९ वर्षीय झुलन गोस्वामीने नुकतीच आणखी एक मोठी कामगिरी केली होती. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात ती सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. झुलनने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ४१ विकेट घेतल्या आहेत. तिने ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज लिन फुलस्टोनचा विक्रम मोडला. झुलनने ३१ तर लिनने केवळ २० सामन्यांत सामन्यांत ही कामगिरी केली आहे.

शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात झुलनने ही कामगिरी केली. ३१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांमध्ये गारद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाने हा सामना १५५ धावांनी जिंकला. झुलन गोस्वामीने या सामन्यात केवळ एक विकेट घेत हा विश्वविक्रम केला.

झुलनने आपल्या करिअरमध्ये १२ कसोटी, १९९ वनडे आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने कसोटीत ४४, वनडेत २५० आणि टी-२० त ५६ विकेट्स घेतल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news