झारखंड रोपवे दुर्घटना : ४६ तासांच्या बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका

झारखंड रोपवे दुर्घटना : ४६ तासांच्या बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड राज्यातील देवघर येथील त्रिकूटजवळ रोपवेला रविवारी मोठा अपघात झाला होता. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तब्बल ४६ तास हे रेस्क्यू चालले. भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि जिल्हा प्रशासनाने परस्पर सहकार्याने हे बचावकार्य पूर्ण झाले आहे.

सर्व लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना ४६ तासानंतर यश आले. तर दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी ट्विट करून या घटनेबद्दल आणि अपघातातील मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देवघरचे उपायुक्त (डीसी) मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे रोपवेच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे हा अपघात झाला. आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट टेकडीवर रोपवेच्या अनेक ट्रॉली एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ केबिनमध्ये ४६ लोक अडकले होते. जखमींना देवघर सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news