Big Clash Box Office : Jawan ला टक्कर देण्यासाठी येतोय The Nun-2

jawan-the nun 2
jawan-the nun 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी 'द नन' च्या दुसऱ्या पार्टचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर खूप भयावह आहे. (Jawan) ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी चित्रपट रिलीज डेटचादेखील खुलासा केला आहे. मजेशीर ही गोष्ट आहे की, द ननचा दुसरा पार्ट शाहरुख खानचा चित्रपट जवानच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहात रिलीज होईल. द नन पार्ट २ देखील यावर्षीचा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि तमिळमध्ये रिलीज होईल. (Jawan)

कधी रिलीज होईल?

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट आधी जूनमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र काहीसा उशीर झाल्याने शाहरुख खानने 'जवान' ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. याआधी अनेकवेळा शाहरुख खानच्या चित्रपटांसोबत अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटांची टक्कर झाली आहे. परंतु द नन II मुळे जवानवर काही विशेष फरक पडत नाही.

बॉलिवूड-हॉलिवूडमध्ये दुसऱ्यांदा टक्कर

ही दुसरी वेळ आहे जेव्हा हॉलीवूडचा हॉरर चित्रपट बॉलिवूडच्या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. मागील वेळी असे घडले होते की, २१ एप्रिल रोजी जेव्हा सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' आणि 'इव्हिल डेड राइज' एकाच तारखेला रिलीज झाले होते. अहवालानुसार, हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६.५० कोटी रुपयांची कमाई केली आणि आता 'द नन II' कडूनही अशीच अपेक्षा आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ४६ कोटींची कमाई केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news