शाहरुख खानच्या ‘जवान’ ने केली ‘या’ तामिळ चित्रपटाची कॉपी; चाहते म्‍हणाले…

jawan
jawan

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सुपरस्टार शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करत आहे. 'जवान' चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये 'मेर्सल', 'बिगिल', 'थेरी' सारखे चित्रपट केले आहेत. ॲटली कुमारच्या या चित्रपटांना चाहत्‍यांकडून खूप पसंती मिळाली आहे.

दरम्‍यान, त्याच्या 'जवान' चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान आणि निर्माते 'जवान' चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने खूप आनंदी आहेत. दरम्यान, 'जवान' चित्रपटावर एक मोठा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोक म्हणतात की, 'जवान' हा तामिळ चित्रपट 'थाई नाडू' ची कॉपी आहे.

'जवान'वर  तामिळ चित्रपटाची कथा चोरल्‍याचा आरोप

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटाने प्रचंड धुकाकूळ घातला आहे. दरम्यान, लोकांकडून चित्रपट दिग्दर्शक ॲटली कुमार यांना सोशल मीडियावर ट्रोल केले. लोकांचे म्हणणे आहे की, 'जवान' हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित असलेल्‍या 'थाई नाडू' चित्रपटाची कॉपी आहे. सोशल मीडिया ट्रोल करत 'थाई नाडू' चित्रपटात साम्य दाखवले आहेत.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news