जालना : ३५० मराठा आंदोलकांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

जालना, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. उपोषणा दरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर लाठीमार व दगडफेकीची घटना घडली. यात ३२ पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांची एक कारही जाळून टाकण्यात आली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ३०० ते ३५० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप एकशिंगे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news