Jalgaon News : गुटखा प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल निलंबित

Jalgaon News : गुटखा प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल निलंबित
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता ते सोडून दिल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ किरण शिंपी यांना बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले. (Jalgaon News)

याबाबत अधिक असे की, पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून ते वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ अमोल शिंपी यांनी सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आले. या विषयीचा अहवाल पहूर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली होती. त्यात वरील दोघांनाही निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले. या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news