जळगाव: चोपडा येथे ‘त्यांनी’ थेट गळ्यात कांद्याची माळ घालून बजावला मतदानाचा हक्क

जळगाव: चोपडा येथे ‘त्यांनी’ थेट गळ्यात कांद्याची माळ घालून बजावला मतदानाचा हक्क

जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क
शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी चोपडा येथे गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून कृषीविषयक मागण्यांकडे कायम दुर्लक्ष होत असते. शेतक ऱ्यांच्या मागण्यांबद्दल शासनाकडून उदासीनता दिसून येते. त्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष यांनी चोपडा येथे मतदानासाठी हजेरी लावताना गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला आहे. शेतीमालाच्या हमीभावासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप  आहे. कापूस, कांदा यांसह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवावी, यासाठी निषेध म्हणून त्यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई शोभाबाई पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव : जिल्ह्यात सरकारच्या निषेधार्थ कांद्याची माळ घालून मतदान करताना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील आणि आई शोभाबाई.
जळगाव : जिल्ह्यात सरकारच्या निषेधार्थ कांद्याची माळ घालून मतदान करताना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील आणि आई शोभाबाई.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news